Marathi Kavita on Love, Life, Inspiration, Comedy
शृंगारिक मराठी कविता
१. शृंगार
रोजच पाहतो तुझा चेहराआज वाटे नवीन काहीशृंगाराची खान तुझीनजरेचा बाण घायाळ करीकमरेवरचा हात तुझानजर झुकवित किंचित खालीओठावरती चमकते लालीहा शृंगार कुणासाठीनटली अशी जणू भासते नटीउतावीळ झाला जीवतुला भेटण्यासाठीमधाळ तुझे ओठत्यावर ठेवून अलगद बोटइशारा करशी मज काहीपैंजणांचा नाद मधुरअसा वाजतो तुझ्या पायीचाल तुझी जणू चालली वाघीणडुलते मान जशी डुलती नागिनकुणास मि काय बोलूनजरा तुझ्यावर हजार आहेतशृंगाराची नशा तुझ्याआज प्रत्येकाच्या नजरेत आहे।
२. शरद पौर्णिमा
क्षीरसागरी स्वच्छंद पोहुनिचंद्र झालाय वेडाधुंदफुंद नभी घालतोधवल दुधाचा सडाबासुंदीचे पाट धरतोरात्र जागुनि खुळानभाच्या अंगणी फुलविचांदण्यांचा मळादुग्धशर्करा योग होताउधाण ये प्रीतीलाप्रियासंगे संग रंगतासुगंध ये रातीलाशब्द शब्द मिटताभाव झाला मोकळाशृंगार असा रातीलाकणाकणात झोकलापाहुनि जगी प्रणयबहारउधाण येई सागराप्रणयधुंद रात सरताजाग येई पाखरांशांत वारे, शांत तारेआकाशही शांत झालेप्रणयाचा बहर सरूनित्रिभुवन सारे क्लांत झाले
३. श्रावणवेढी राधा
कोकिळेची साद तीश्रावण घेऊन आली ,आणि आसुसलेली धरणी तीआज ओलिचिंब झालीकाळ्या काळ्या त्या ढगांच्या साक्षीनेही हवा फुलांचा गंध ल्याली,आणि निसर्गाच्या या स्वप्ननगरीतश्रावनवेडी राधा प्रेमरंगी न्हाली...
४. रूप
त्याच्या मधाळ शब्दातओठांची मोहोळ खुलेतिच्या दीर्घ हास्यातहृदयात त्याच्या धडधडेगालावरची खळी पाहूनपोटात खड्डा पडेपापणीच्या शिंपल्यातमोती नजरेचा चमकेडोळ्यावरली अलगद बटवाऱ्यासह हेलकावेचंद्रापरी देखणे रूपपाहून रोमरोम शहारेथिजले तुझ्या रूपातमाझे कटाक्ष चोरटेलावी वेड जीवाघायाळ रूप देखणे
५. एक बाप
जो राब राब राबलापण कधीच नाही थकलाज्याने थेंब थेंब गाळलापण कधीच नाही थांबलाजो जीवावर खेळलापण कधीच ना घाबरलाजो आपल्यांसाठी जगलापण कधीच ना मोह केलाजो फाटके घालून फिरलापण मुलास आपल्या सजवलाज्याने घासातला घास काढलापण कधी पोटभर नाही जेवलाज्याने स्वप़्नास आपल्या जाळलापण कधीच नाही रडलाज्याने अश्रुंना आपल्या साठवलापण विदाईला ना रोखू शकलाज्याने मनाला कठोर केलापण कधीच ना प्रेम विसरलाजो रात्र रात्र जागलापण कधीच ना बेभान झोपलाजो घोडा गाडी झालातो मुलांचा एक खेळणा झालाजो मुलांचे अत्याचार सोसलापण कधीच काही ना बोललाज्याने मुलांचा सुख आनंद पाहलातो एक दिवस निवांत शांत झोपला
प्रेरणादायी मराठी कविता / Inspirational Marathi Kavita
१. मदिरा आख्यान
पाहूनीया बाटली ! सुटे ना मुखा पाणी !परलोक तो प्राणी ! पक्का जाणावा !!जया अखंड ध्यास ! पिण्याचीच ती आस !ऐसा भला माणूस ! विरळा जाणा !!पितो मना पासून ! पाजतो आग्रहाने !कधी उसनवारीने ! दोस्तांत प्रिय !!लुटूनी घरा दारा ! गुत्याला जगवितो !सकलां विसरतो ! व्यसनी खरा !!खंगुनीया तो जाता ! पिऊन मदिरा हाला !म्हणे कामातून गेला ! एक दारूडा !!वाईटच हे व्यसन ! जावू नये त्या वाटे !जाताची कर्म फुटे ! वदतो शिवा !!
२. श्रावण महफ़िल
श्रावणात माझी मैफिल सजून गेलीपाहता फडाची लावणी दमून गेली**गायीले गीत माझे मैफिलीत माझ्यास्वरांच्यासवे बघ ही रात्र रंगुन गेली**स्वातंत्र्य दिन साजरा आज बहात्तरावातिरंग्यापुढे आज मान झुकून गेली**आठवा आज हो त्या वीर जवानांनातयांच्या साठी दोन आसवे टपून गेली**सरसर पाऊस थोडे बघा उन्ह पडेआनंदाने कशी धरणी रमून गेली**चला गं सयांनो आज नाग पूजायलासणात कशी बघा फुगडी घुमून गेली**नेमेची येतो महिना कसा श्रावणाचाआनंदाने बघ कशी मने बहरून गेली
३. श्रीमंती
वारसा संतांचा, अभंगाचे मळेशब्दांमृत फळे, सकल जना !स्पष्ट होण्या भाव, भाषेचा सहाराशब्द त्यां फुलोरा, रचनात्मक !शब्दांतुनी येता, भावनांचा मेळाश्रोते होती गोळा, सुजाण सारे !गोडवे आम्हासी, माय मराठीचेकौतुक शब्दांचे, तिन्ही त्रिकाल !अर्पुनी शब्दधन, रसिकाचे जातीलाभली श्रीमंती, कुबेरा पेक्षा !
४. विना विना
विनासायास विनाप्रयास,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,हलते का काही?विनासाहस विनाधाडस,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,वळते का काही?विनाधडपड विनापडझड,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,जळते का काही?विनाविचार विनाआचार,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,रुळते का काही?विनाध्यास विनाअभ्यास,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,कळते का काही?विनाखटपट विनाझटापट,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,टळते का काही?विनादर्शन विनाआकर्षण,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,जुळते का काही?विनाचळवळ विनाखळबळ,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,पळते का काही?विनाकष्ट विनाउद्दिष्ट,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,बळते का काही?विनाघर्षण विनामर्जन,मिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,दळते का काही?मिटुनी डोळे झोपुनी निवांतमिळते का काही?बसल्या जागेवर, आयते आपोआप,फळते का काही?
५. एक रानी
लाखों जनांची जननीलाखात एक राणीमहाराणी ताराराणीमहाराणी ताराराणीलाख उपकार तुझेआज भोगतो स्वातंत्र्यातुझ्या एका भरारिनेहरविले परतंत्र्यानाही केलास विचारकधी राज्य भोगन्याचाकानी घूमे तुझ्या फक्तनाद प्रजा वेदनांचाकिती सोपे होते तुलाधर्मा पाठ दाखविनेएक आहे मी अबलापळ म्हणून काढ़नेतुझ्या शीरी शिवबाचातेंव्हा नव्हता तो हातजनमाच्या सोबतीचीहरविली होती साथतरी घेतला निर्णयएकटीने नेतृत्वाचाफक्त बदल्याचा नव्हेनिश्चय तो बदलाचासुरु केलास अध्यायनारीच्या सहभागाचातूझ्या तलवारिने केलानाश तिच्या अभाग्याचाघेतले हाति खड्गसर्व बंध झुगारूनीतुझ्या तपाचे ते फळमाझ्या हातात लेखणीदिशा दर्शक तो जसाध्रुवतारा ,ताराराणीदेवा माझाही बनु दे तसा धर्म ताराराणीआणि कर्म ताराराणी
हे पण वाचा : Happy Diwali Wishes in Marathi
हे पण वाचा : Inspirational Quotes in Marathi
मराठी विनोदी कविता / Marathi Comedy Poems
१. झेब्रयाचा जन्म
एकदा वाघ शिकारीस निघालाशोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेलाडौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडेगाढवांचा कळप तेथे चरण्यासी आलाहेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्यानेअसेल फर्लागभर अंतरावरघेऊन पावित्रा मारणार उडीइतक्यात नजरभेट झालीत्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडीअन शिकारी खुद्द शिकार झालातारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याचीघेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्याव यथेच्छ जोड्याने चरण्याच्यामंगला समयी लग्न लागलेसोहळ्यास सारे जंगल लोटलेसर्व सुखांत ते तृणभक्षकआता भय नसे कुणाचेवाघच आपला रक्षकमंगलाष्टक म्हंटली गेलीकालांतराने गाढवीण व्यायलीदिलं नवीन रुपडं जंगलालाअय्या नवलच झालंबछडं आलं कि गधडं आलंकि अजून काय आलं ओ जन्मालागाढविणीची कांती आणि वाघाचे पट्टेउड्या मारुनी घोड्यावानी खिंकाळतेगधडं गुरकावुनि खिंकाळी फोडीगवत खाउनी लाथा झाडीगधडं कि बछडं , पण एक नवीनच रुपडंअहो , गाढवच ते फक्त वाघांचं कातडंबघता बघता झाला जंगलभर बभ्राघटस्फोट घेऊनि नाव ठेवलं " झेब्रा "
२. री री री री
बिनपगारी फुलअधिकारी झाले चिकाररोजगारी बेकारी झाली भिकारसत्ताधारी कारभारी झाले चुकारदादागिरी भाईगिरी झाली टुकारलाचखोरी भ्रष्टाचारी भरला बाजारशेतकरी कष्टकरी झाले बेजाररहदारी घुसखोरी देतेय मुकामारदुनियादारी इमानदारी पेटली वखारहरामखोरी चोराचोरी नाना विकारगुलामगिरी चेंगराचेंगरी माजला हाहाकार.
३. धोका ये इश्क़ का !
तुम्हारी आखो का काजल औरप्यार का आचाल हमे बरबाद कर गयाबोहोत धोके खाये हमणे इश्क में जानेमन'तेरी मोहबत का शिकार हो गयाहम ना करते मोहबत तुझसे पर तेरेभोले पण में बेकरार हो गयातुझे पेहेचान नें के लिये जानेमान पेहलिबार नजाणे कैसे धोका खा गयाखुश थे हम हमारी इस दुःख की दुनिया मेंपगली किस खुशी में हमे इतना रूला दियाजखमी हमारे दिल को आज फिर तुने येहसीना ऐसा सितम दे दियाप्यार भरी हमारी जिंदगी में मोहबत का एकझुटा जहर भर दियापी के तेरे इश्क का प्याला ये आशिक बेवजह हलाल हो गया'तेरी झुटी हसी पर न जाणे कैसे पागल प्रेमीआज कुर्बान हो गयाजाते जाते एक बात बोल दु तुम्हे 'तेरी खुशी के लियेये इश्क का शेहजादा खुदा को प्यारा हो गयाइश्क में है धोके सब इस बात का सारा जहागवा हो गया
४. बगल
उचकी लागली आणि जाग आलीपाहिलं न् तु ऑनलाईन दिसली !झोपलेला होता नवरा तोवरसासुची तेवढ्यात झोप उडाली !काय राव झाली भलतीच गोचीबायकोचीपण इथ झोप उघडली !न आलेलं नळाला पाणी, आणिउकळत्या दूधावर चर्चा झाली !विषय काय घ्यावा हो रम्य प्रहरीम्हणता, चर्चेला त्या बगलच दिली !
५. बाई पलंगावर बसून होती
बाई पलंगावर बसून होतीगुलाबराव मस्त मळत होतेमळता मळता बघत होतेबाईकडं गिधाडावानीबाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासेकधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसेमळता मळता थाप मारलीराळ उडालेली नाकात बसलीशिंकेवरती शिंक आलीशिंकण्यातच सारी रात गेलीआवाजाने गावाला जाग आलीबाई जाम उखडलीवाहून शिव्यांची लाखोलीचरफडत चोरपावलांनी निघून गेलीरात बी गेली अन बाई बी गेलीथापा मारण्यातच वेळ गेली
विरह मराठी कविता / Virah Marathi Poem
१. प्रेमात तुझ्या
प्रेमात तुझ्या काय काय मी केलेकाट्यांचे फुलं करून तुला वाहिलेदुःखापासून वंचित तुला मी ठेवलेप्रत्येक वादळातुन तुला मी सवारलेप्रेमात तुझ्या मला शिव्या मिळाल्यात्यापण मी आनंदाने गिळल्याबऱ्याच दुःखद घटना तुजपासून दूर ठेवल्याआणि आनंदाच्या लाटा तुझ्याकडे वळवल्याप्रेमात तुझ्या मी खुप सहन केलंप्रत्येक प्रसंगाला मी तोंड दिलंजीवनात थोडं हास्य होतं मी सांभाळलंसारंच्या सारं तुझ्यासाठी खुलं केलंप्रेमात तुझ्या मी स्वतःपासून दूरावलोक्षणा क्षणाला तुझ्या पाठीमागे मी राहिलोतुझ्यासाठी मी वादळाच्या घेरात आलोतुला आनंदी पाहण्यासाठी मी *जोकरही* झालोप्रेमात तुझ्या निराशा मला मिळालीमाझी सारी खटपट व्यर्थ गेलीलग्न करुन तू सासरी निघालीश्वास सोडला मी ,जेंव्हा तुला आनंदी पहिली
२. अथंग प्रेम
चाललीस तु सोडुन तर.......माघ वळुन बघतेस का...?मी होतो तसा बरा होतोमला बदललस का...?प्रेमात घमंडी तु अन्...मी हताश आज आहे।तुझ्या नजरेत टायमपासअन् माझ्यासाठी स्वर्ग आहे।ते म्हणजे *"अथांग प्रेम"*
३. एक दिवस येईलच
कवी अमोलभाऊ शिंदे पाटील:*शीर्षक.एक दिवस येईलच*नाहीतरी कोण असतं आपलं म्हणायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायलाजायचंच आहे तुला तरएकदा हळव्या मनाला छळून जामरण जवळ येईलच आतारचलेल सरण ही तू जाळून जाजळणारच आहे आत्मा ती भरकटायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायलामागितलं नव्हतं काहीच तुलाजरासा इरादा होता जपण्याचाहृदय होते तुझे मंदिर गंविचार केला होता लपण्याचातयार ना झालीस हृदयात मला जपायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायलाझटकशील हात माझेखडतर अंधाऱ्या वाटेवरकाजवे ही आले बघ काजळलेल्या त्या राखेवरविरान रात काजव्यांची वेळ ना सरायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायलाराख अशीही झाली होतीन पाहिलेल्या रंगीत स्वप्नांचीरंग ही सारे उधळून गेलेकिंमत राहिली फक्त रकमांचीसारं संपून गेलं अर्थ राहिला ना जगायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायलासखे असंच असत प्रेम तरजिव्हाळा तुझा बोचला असतारक्त रंजित झाली असती धरणीहृदयी घाव मी तेव्हा सोसला असताताकद ना राहिली घाव ते सोसायलाएक दिवस येईलच जग हे सोडून जायला
४. वेदना प्रेमाची - Marathi Kavita
वेदना प्रेमाची आजही तितकी आहेतुझाच होतांना आपुलकी जितकी आहेतुझ्या ही माझ्या ही कधीजागु दे पुन्हा त्या संवेदनानिस्सीम तुझाच होतांनाजड होतील ही त्या वेदनाहृदयात जपतांना आगही तितकी आहेतुझाच होतांना आपुलकी जितकी आहेतुझं पत्रावळी सारख तुडवनकाळजाला घाव देऊन गेलंनकळत मग समुद्रावर हीवादळ विरहाचं घेऊन आलंरातीच्या वादळाला जागही तितकी आहेतुझाच होतांना आपुलकी जितकी आहेमेहंदीचा रंग चढत होतातसा ओढणीचा रंग बदलत होतातेव्हा धरणी ही काटेरी वाटलीबोहल्यावर चा काटा सलत होताहृदय जळतांना राख ही तितकी आहेतुझाच होतांना आपुलकी जितकी आहेमी ही वाट पाहत होतोदेऊन जाशील तरी सुखालाविणलेली दोर झालीस तूअन ताण देऊन गेलीस दुःखालागळ्यात दोरीची दाह ही तितकी आहेतुझाच होतांना आपुलकी जितकी आहे
५. आयुष्याच्या वाटेवर - Marathi Kavita on Life
आयुष्याच्या वाटेवर सगळंच काही आलबेल नसतंआणि म्हणून गेलेला तोल सावरायला कोणीतरी साथ हवं असतंशब्दाने शब्द वाढवून एकमेकाचं कुठं चुकलं हे पाहायचं नसतंतर शब्दांच्याही पलीकडल्या मायेच्या उबेत विसावायचं असतंएकानं फटाक्याची दारू झालं तर दुसऱ्यानं वात व्हायचं नसतंआणि क्षणिक रागापायी संसाराच्या घटाचा स्फ़ोट करायचं नसतंआपल्या माणसाचं मन ओळखून त्याच्या उणिवांना समजून घ्यायचं असतंउणिवांनाहि मागे सारून त्या संसाराच्या घटात छानसं रोपटं लावायचं असतंते रोप फोफावायला प्रेमाचं अखंड पाणी घालायचं असतंआणि त्या रोपावर फुललेल्या कळीला जीवापेक्षाही जास्त जपायचं असतंकधी प्रखर उन्हात असताना त्या रोपाला मायेच्या सावलीत सारायचं असतंपण मंद पावसात मात्र त्याला चिंब न्हाऊ घालायचं असतंहेवे दावे सोडून माणसातल्या मनाला साद घालायचं असतंकारण त्या मनात एक प्रेमाचं अतूट नातं विणलेलं असतंरागाला त्सुनामीच्या लाटेसारखं उंच जाऊ द्यायचं नसतंआणि अशी लाट आलीच तर काळजाची होडी करून दोघांनी पार जायचं असतं
मराठी प्रेम कविता / Marathi Prem Kavita
१. प्रेम सर्वांनाच नहीं लाभत
प्रेम करणंही नाही हुकतप्रेमाचा अर्थ ज्यांना नाही सापडतप्रेम ते पण असतात शोधतप्रेम करायला नाही कोणी मिळतप्रेम करण्यासाठी पण फिरावंलागतं प्रेम मागत ...प्रेम करून नसते कोणी लाजतप्रेम घेवून नाही कोणी माजतप्रेम कर म्हणून सागावं नाही लागतएका हाताने कधी टाळी नाही वाजतप्रेम करणारे कायम प्रेमच असतात करतप्रेम आपल्या..मनातून नाही निघतएकंदरीत प्रेम कधीच सुट्टी नाही काढत
२. खरच मला प्रेम करता येत नाही
ती माजी काळजी घेत राहते, निशब्द होऊन माज्यासाठी जिजत रहाते |तिज्या साठी काय करावे हेय काय कळत नाय ||अन खरंच मला प्रेम करता येत नाय..कधी कधी ती एकटक बगत राहते, न जाणे काय विचार करत राहते |तिला त्या विचारातून बाहेर कसे काढावें हे काय कळत नाय ||अन खरंच मला प्रेम करता येत नाय..ती सतत काही न काही विषयांवर बोलत राहते |खरंतर ती मला येईकन्यासाठी बडबडत राहते ||मी न येईकल्या सारखे करत राहतो ,तिज्याबर तसंन-तास काय बोलावे हे मला काय कळत नाय ||खरंच मला प्रेम करता येत नाय..ती रडतं असताना तिला जवळ घेऊन ,डोक्यावरून हाथ फिरवत, "काळजी नको करुस मी आहे ना"|हे बोलण्याचे हि धाडस होत नाय ||खरंच मला प्रेम करता येत नाय..मनात प्रेम असूनहि , मला व्यक्त करता येत नाय,अगं वेडे तुज्या शिवा माझे हि कोण नाय |तिला मीटी मारून कुरवळने हे, कृतांत हि मला करता येत नाय ||खरंच मला प्रेम करता येत नाय..पूर्वी जन्माचे हे, काय माझे पुण्य नाय ,परमेश्वर हे तुझेच उपकार आहेत |माझे हृदय दगडाचे असले तरी त्याला ,असा निस्वार्थी प्रेमळ पुजारी देणारा तूंच आहेस |देवा आता एकचं उपकार कर , या दगडाला हि पाजर फुटू दे |अन मला तिज्या बदल चे प्रेम, व्यक्त करता येऊ दे |खरंच मला प्रेम करता येवू दे...खरंच मला प्रेम करता येवू दे ...
३. इतकी का सुंदर दिसतेस तू..
मी विचारल्यावर हळूचगालात का हसतेस तूउघड कधीतरी हे रहस्यहि कसली जादू केलीस तू ...तुझ्यातच माझं मन रमतंतुझ्या सहवासातच ते हसततुझ्या पासन दूर जायला मन घाबरतका समजून घेत नाहीस तूइतकी का सुंदर दिसतेस तू ....मनाच्या एका कोपऱ्यात सजवलंय ग तुलामाझ्या लेखणी ने कोऱ्या कागदावरती रंगवतोय तुलानवीन काही लिहाय घेतलं तर तुझाहसरा चेहरा समोर येऊन जातोइतकी का सुंदर दिसतेस तू ……….शब्दांच्या कोड्यांमधून निघूनतुझ्या स्वप्नांमध्ये रमून जातोइतकी का सुंदर दिसतेस तू ना कळततुझ्यातच गुंतून जातो मीइतकी का सुंदर दिसतेस तू ……….पावसाच्या सरीत भिजतानाखूप छान दिसतेस तूबागेमधील फुलांकडे बगतानजरेस पडते तूतुझं रूप बघून गुलाबाच्याफुलाला लाजायला येईलइतकी का सुंदर दिसतेस तू ....डोळे बंद करताच येतेस समोर तूडोळे बंद करताच समोरून जातेस तूयेवडंच तुझं माझं नातं नसतानाहीमाझ्यासोबत असतेस तू ......इतकी का सुंदर दिसतेस तू ....
४. माझ प्रेम - Marathi Kavita for Love
वंसत ऋतू मधल्या पहिल्या पावसाच्याथेंबा सारखा होत माझं प्रेम,जो धरतीच्या कूशीत पडताच आपला सुंगधदरवडणारा आणि मन तृप्त करून जाणारा होता माझं प्रेम...मंदिरातल्या पुजारि सारखा होता माझं प्रेम,जो देवाच्या भक्तिमध्ये तल्लीन होऊन त्याचाभक्ति मध्ये आपला सर्वस्व अर्पण करणाराहोता माझं प्रेम...गगण आणि समुद्रासारखा होता माझं प्रेम,जरी एकमेकांपासून दूर असलो तरी समुद्रामध्येआपल्या प्रेमाचा निळा रंग सोडून आपल्या प्रेमाचीजाणीव करून देणारा होता माझं प्रेम...प्रेम म्हंटले कि तिच नाव आणि तिचा नाव म्हंटलेकि माझं प्रेम,माझ्या प्रेमाची व्याख्याच तिच्या पासून सुरू होऊनतिच्या मध्येच संपेल असं होता माझं प्रेम...गुलाबाच्या फूला सारखा होता माझं प्रेम,दिसण्यास जितका सुंदर मार्ग मात्र तितकाच काटेरी...म्हणून धर्माचा तो काटा माझ्या प्रेमाच्या फूला पेक्षाश्रेष्ठ ठरला आणि माझ्या प्रेमाची किंमत कमी करूनजाणारा असं होता माझं प्रेम...
५. प्रेमवेडी - Marathi Kavita
एक होती प्रेमवेडी माझ्यावरखुप प्रेम करायचीआठवण जरी आली माझी कीदिवसरात्र कवीता करायचीनाही दिसलो मि तीला कीकाळजी करत शोधायचीआलो जवळ तिच्या की मगहळुच लपुन ती लाजायचीरूपाने तिच्या मलाभूरळ तीच पाडायचीस्वप्नाच्या दुनियेत जाऊनतिचेच स्वप्न दाखवायचीकवी अनिकेत मशिदकर
मित्रांनो आपल्याला जर ह्या सुंदर मराठी कविता आवडल्या असतील तर आम्हाला नक्कीच Comment Box मध्ये लिहून कळवा. आपल्या प्रिया व्यक्तिं सोबत ह्या कविता Share करायला विसरू नका. धन्यवाद

0 comments:
Post a Comment